2023 मध्ये बुलेट ट्रेन भारतात धावणार, मुंबई ते अहमदाबादसाठी ‘एवढं’ तिकिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असलेली ‘बुलेट ट्रेन’ 2023 पर्यंत धावण्यासाठी तयार होणार आहे. या प्रकल्पाचे हेड अचल खारे यांनी सांगितले की येत्या नोव्हेबरमध्ये याबाबतचे टेंडर दिले जाणार आहे आणि पुढील वर्षी मार्च महिन्यात या प्रकल्पाला सुरुवात होईल. 2023 मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.

या प्रकल्पाची अनेक दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती मात्र भूमी सर्वे आणि मार्गावरून जाणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्यास अधिक वेळ लागत आहे. मात्र अहमदाबाद ते मुंबई असणाऱ्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे.

3000 रुपयांपर्यंत असणार भाडे
हाई स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने दिलेल्या माहितीनुसार या बुलेट ट्रेनचे भाडे तीन हजारांपर्यंत असेल. अहमदाबाद ते मुबई या 508 किलोमीटर अंतरामध्ये 12 स्टेशन असणार आहेत. तसेच या संपूर्ण प्रकल्पासाठी 1380 हेक्टर इतकी जमीन लागणार आहे.

राज ठाकरेंचा बुलेट ट्रेनला विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनला विरोध आहे. त्यावर मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एक विटही रचू दिली जाणार नाही, असे राज ठाकरे अनेकदा म्हणाले होते. प्रत्येक्षात जेव्हा काम सुरु होईल तेव्हा राज ठाकरे बुलेट ट्रेन बाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –