S R Patil Samajbhushan Award | सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार सेवानिवृत्त IPS मीरा बोरवणकर यांना जाहीर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील समाजभूषण पुरस्कार (S R Patil Samajbhushan Award) सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर (IPS Meera Borwankar) यांना जाहीर झाला आहे. रोख एक लाख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सा.रे. पाटील पुरस्कार (S R Patil Samajbhushan Award) वितरण समारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांच्या हस्ते व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती (Shrimant Shahu Maharaj Chhatrapati) यांच्या अध्यतेखाली होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण 1 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

 

याशिवाय लेखक सुधीर भोंगळे (Sudhir Bhongle) यांना समाजकार्य पुरस्कार, आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत (Rahi Sarnobat) यांना युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाठ (Vinod Shirsath) यांनी दिली. दत्त साखर कारखान्याचे संस्थापक व माजी आमदार दिवंगत डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या स्मृतिदिनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

 

मागील चार वर्षापासून या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील लेखक व संशोधक सुधीर भोंगळे
यांना सा.रे. पाटील समाजकार्य पुरस्कार (Social Work Award) देण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख,
मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर क्रिडा क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचे नाव लौकिक करणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू राही सरनोबत हिला सा.रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार (Youth Inspiration Award) देण्यात येणार आहे. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्काराबाबत माहिती देतना विनोद शिरसाट (Vinod Shirsat) म्हणाले, व्यावसायिक नितिमूल्यांचा अंगीकार करीत,
ध्येयवादी पद्धतीने काम करणाऱ्या सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य किंवा उद्योग या क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
यंदाच्या वर्षी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील समाजभूषण पुरस्कार निवृत्त पोलीस अधिकारी (Retired Police Officer)
मीरा बोरवणकर यांना प्रदान केला जाणार आहे.

 

Web Title :- S R Patil Samajbhushan Award | retired ips officer meera borwankar s r patil samajbhushan award announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

Bhandara Crime News | भंडाऱ्यामध्ये रोड रोमिओने काढली तरुणीची छेड; लोकांकडून बेदम मारहाण

Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल