पुण्याचे तत्कालीन उपायुक्त बनले लडाखचे पहिले पोलीस प्रमुख, ‘मराठी’ माणूस केंद्रशासित प्रदेशच्या ‘सर्वोच्च’ पदावर

लेह : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले सतीश एस खंदारे हे लडाख या नव्या केंद्र शासित प्रदेशाचे पहिले पोलीस प्रमुख बनले आहेत. लडाख हे आजपासून नवीन केंद्र शासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला आहे. त्याच्या पोलीस प्रमुखपदी खंदारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

एस. एस. खंदारे हे १९९५ च्या केडरचे जम्मू आणि काश्मीरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर आले होते. त्या काळात त्यांनी पुणे शहर पोलीस दलात परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले होते.

खंदारे हे आतापर्यंत केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्याची मुदत संपल्यानंतर जून २०१९ मध्ये त्यांची जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय आयएएस अधिकारी उमंग नरुला यांची लडाखचे उपराज्यपाल यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नरुला हे जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे प्रमुख सचिव होते. मलिक यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com