S. S. Rajamouli | ‘RRR’चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे चित्रपटसंदर्भात मोठे वक्तव्य; म्हणाले….

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. आलिया भट्ट, राम चरण, अजय देवगन आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला. ‘नाटू नाटू’ गाणं एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलं असून काल भैरव आणि राहुल सिपलिगुंग यांनी गायलं आहे. त्यानंतर आता चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. ‘आरआरआर’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकला. (S. S. Rajamouli)

 

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे. याबरोबरच जगभरातून या चित्रपटाला प्रचंड मोठा चाहता वर्ग मिळाला. जपानमध्ये तर या चित्रपटाने रजनीकांत यांच्या चित्रपटाचा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. आता या चित्रपटाच्या ऑस्करची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर या चित्रपटाने 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. खुद्द राजामौलीसुद्धा (S. S. Rajamouli) या चित्रपटाच्या ऑस्करवारीसाठी प्रचंड उत्सुक आहेत.

 

नुकतंच त्यांनी हॉलिवूडच्या एका पत्रकाराशी संवाद साधला. यादरम्यान ते म्हणाले, “मी चित्रपट केवळ पैसे, व्यावसायिक यश आणि माझ्या प्रेक्षकांसाठी बनवतो. आरआरआर हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. त्या चित्रपटाला मिळालेलं यश माझ्यासाठी सर्वकाही आहे, पुरस्कार, मान सन्मान या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. ते सगळे पुरस्कार माझ्या संपूर्ण टीमसाठी आहेत ज्यांनी चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे.”

 

Web Title :- S. S. Rajamouli | rrr director ss rajamouli says he makes movie only for commercial success and audience

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना