अमित शहा यांच्या ‘त्या’ दाव्यावर उद्धव ठाकरेंची जोरदार ‘टीका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलं होतं की, राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचचं सरकार येणार. शहांचं हे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खटकल्याचं दिसत आहे. शहांच्या या वक्तव्याला अनुसरून उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे बाकी आहे, दुसरे काय ?” असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्रात आता कोणाचेच प्रश्न शिल्लक नाहीत, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे’
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या मुद्द्यावर तिरकस भाष्य केलं आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील निडवणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवण्याच्या भाजपच्या रणनीतीवरही त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, “राष्ट्रीय प्रश्नांची एक नशा असते. त्यापुढे इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल, असं सध्याचं वातावरण आहे. महाराष्ट्रात आता कोणाचेच प्रश्न शिल्लक नाहीत, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याच पक्षानं दाखवला नव्हता. भाजपकडं हा आत्मविश्वास आहे याचा आम्हाला आनंदच आहे.”

‘लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय ?’
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, “फडणवीस यांनी महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पुढं नेला आहे अंस प्रमाणपत्र शहा यांनी दिलं आहे आणि तेच पुढचे मुख्यमंत्री होतील असंही जाहीर केलंय. त्यामुळे राज्यातील निवडणुका ही केवळ औपचारिकता उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय ?”

काय म्हणाले होते अमित शहा ?
अमित शहा यांनी रविवारी मुंबई भाजपच्या एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी बोलताना अमित शह यांनी राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचं सरकार येईल असा दावा केला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील” असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. शहा यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता परसली.

Visit : Policenama.com