SA VS AUS T20 WC Final | दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ महिला खेळाडूने रचला इतिहास

पोलीसनामा ऑनलाईन : SA VS AUS T20 WC Final | दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन या ठिकाणी काल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत 6 व्यांदा विश्वविजेतेपद जिंकले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जरी पराभव स्वीकारावा लागला असला तरी आफ्रिकेच्या एका खेळाडूने मात्र इतिहास रचला आहे.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत फक्त 137 धावाच करू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. परंतु दक्षिण आफ्रिका संघाची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने या सामन्यात दोन विकेट घेऊन इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे.

दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने आतापर्यंत महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 विकेट घेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

या यादीमध्ये शबनीमच्या खालोखाल इंग्लंडची गोलंदाज अन्या श्रबसोलेचा नंबर लागतो तिने 27
सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत.
तर तिसऱ्या नंबरवर ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी आहे तिने 42 सामन्यांत 40 विकेट घेतल्या आहेत.

Web Title :-  SA VS AUS T20 WC Final | shabneem ismail became most wicket taking bowler in women t20 wc sa vs aus final match

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अक्षय कुमारने पान मसाल्याचा जाहिरातीत काम करण्याबाबत केले मोठे वक्तव्य; म्हणाला – ‘ती माझी सर्वात मोठी चूक….’

Bhandara Crime News | भंडाऱ्यामध्ये रोड रोमिओने काढली तरुणीची छेड; लोकांकडून बेदम मारहाण

Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Pune Crime News | भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी

T20 Women’s World Cup | दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने 6 व्यांदा जिंकले विश्वविजेतेपद