‘असा’ आहे प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’, दुबईमधून आला पहिला ‘रिव्ह्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला साहो चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. 350 कोटी रुपये बजेट असणाऱ्या या सिनेमाचे प्रेक्षकांना वेध लागले असून दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात काम करत आहे. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतात जरी हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार असला तरी दुबईमध्ये काल या सिनेमाची स्क्रीनिंग पार पडली. त्यानंतर आज भारताच्या एक दिवस आधी दुबईत हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्यानंतर या सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. सोशल मीडियावर हा रिव्ह्यू सध्या वेगाने व्हायरल होत असून हा सिनेमा धमाकेदार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.

दुबईतील पत्रकार उमेर संधू यांनी ट्विट करत सिनेमाचा हा रिव्ह्यू दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, पहिल्याच सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची शानदार केमिस्ट्री जुळून आलेली आहे. प्रभासचे स्टंट्स अतिशय उत्तम आहेत. डायलॉग देखील शानदार आहेत. या सिनेमाला मी चार स्टार देतो.

https://twitter.com/UmairFilms/status/1166287131234492416

10 हजार स्क्रीनवर होणार प्रदर्शित –

भारतात हा सिनेमा 10 हजार स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. तर काही जाणकारांच्या अंदाजानुसार भारतात हा सिनेमा पहिल्या दिवशी 75 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. साहो चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून यामध्ये हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –