Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाहुबली फेम अ‍ॅक्टर प्रभास साहो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरही दिसणार आहे. जेव्हापासून या सिनेमाचा टीजर समोर आला आहे तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आहे. नुकताच या सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीजर रिलीज झाला आहे. हे गाणं म्हणजे एक पार्टी नंबर आहे. ज्यात प्रभास आणि श्रद्धाची हॉट केमिस्ट्री दिसणार आहे.

या गाण्याच्या टीजरची सुरुवातच हॉट मूव्सने होताना दिसते. यात श्रद्धाने घातलेल्या डार्क ग्रीन शिमर ड्रेसमध्ये श्रद्धा खूपच हॉट दिसत आहे. या व्हिडीओत प्रभास ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या गाण्यात प्रभासचेही डान्स मूव्स आहे. २८ सेकंदाच्या या गाण्याच्या टीजरमध्ये दिसणारी श्रद्धा कपूरची सायको केमिस्ट्री तुम्हालाही नक्कीच आवडेल. ध्वनी भानुशालीने हे गाणं गायलं आहे. पूर्ण गाणं जरी समोर आलेलं नसलं. तरी टीजरवरून गाण्याचं म्युझिक चांगलं वाटत आहे. तनिष्क बाग्चीने हे गाणं कंपोज केलं आहे.

३०० कोटींचा सिनेमा

याआधी सिनेमाचे काही टीजर्स चॅप्टरच्या रुपात समोर आले आहेत. यामध्ये प्रभास आणि श्रद्धाचे काही अ‍ॅक्शन सिक्वेंस आहेत. हा सिनेमा स्टंट सीन्सने खचाखच भरलेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमासाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हिंदी व्यतिरीक्त हा सिनेमा तमिळ आणि तेलगू भाषेमध्येही बनवला जाणार आहे. सुजीतने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात प्रभास आणि श्रद्धा व्यतिरीक्त नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘या’ सिनेमांशी होणार ‘साहो’ची टक्कर

प्रभास आणि श्रद्धा स्टारर साहो सिनेमा १५ ऑगस्ट रोजी रिलीज केला जाणार आहे. परंतु या दिवशी रिलीज होणारा हा एकच मोठा सिनेमा नाही, तर साहोची टक्कर अक्षय कुमारच्या मिशन मंगल आणि जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस या सिनेमांशी होणार आहे. प्रेक्षकांना नेमका कोणता सिनेमा आवडतो हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

You might also like