Movie Review : दमदार ‘अ‍ॅक्शन’ आणि प्रभास-श्रध्दाच्या ‘हॉट’ केमेस्ट्रीनं मनं जिंकली, एकदा जरूर पाहण्यासारखा ‘साहो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडची गोंडस अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चित्रपट ‘साहो’ आज रिलीज झाला. चित्रपटाची दमदार अ‍ॅक्शन आणि प्रभास – श्रद्धाच्या हॉट केमिस्ट्रीने प्रेक्षक चांगलेच खुश होतात. प्रभास आणि श्रद्धा व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी आणि महेश मांजरेकर हे दिग्गज कलाकार आहेत.

चित्रपट पाहताना कोणतेही लॉजिक न लावता चित्रपट पाहणे गरजेचे आहे त्यामुळे ज्या प्रेक्षकांना मार धाड वाले सिनेमे आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन आहे. आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या चित्रपटाला ओके म्हणतात. मात्र, साऊथ सुपरस्टार असल्याने हा चित्रपट दक्षिणेत जोरदार धुमाकूळ घालत आहे.

चित्रपटाची सुरूवात दमदार ऍक्शन ने होते.प्रभासचा अभिनय पाहताना अनेकदा बाहुबलीची आठवण येते मात्र हा सिनेमा बाहुबली पेक्षा खूप वेगळा आहे. श्रद्धा कपूर ने आपला अभिनय सुंदर पद्धतीने वठवला आहे. एक पॉवरफुल पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्याला दिसून येते. दिग्दर्शक सुजित यावेळी काहीसे गोंधळलेले वाटले कारण अँक्शन आणि रोमॅन्सची सांगड घालताना त्यांचा जरा गोंधळ उडाल्याचे दिसून येते. चित्रपट मनोरंजनात्मक आहे २ तास ५० मिनिटामध्ये प्रेक्षकांना दमदार ऍक्शन पाहायला मिळते.

अभिनय –
चित्रपटाची पटकथा खूप चांगली आहे. प्रभासने उत्तम अभिनय केला आहे. मात्र, बाहुबलीचा लूक त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही. तो चित्रपटात जरा थकलेला वाटतो. याशिवाय त्यांची डायलॉग डिलिव्हरीही थोडी हळू दिसते. श्रद्धा या चित्रपटात खूपच सुंदर दिसत आहे.

श्रद्धाच्या भूमिकेसंदर्भात या सिनेमात एक गडबड होती. चित्रपटाच्या सुरुवातीला ती भक्कम पोलीस अधिकारी म्हणून दिसते. पण नंतर प्रभास तिला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. चित्रपटात अभिनेता चंकी पांडेचा अभिनय उत्तम झाला आहे.

दिग्दर्शन –
चित्रपटात कोणतेच लॉजिक लावण्याची गरज पडत नाही, पटकथा चांगली आहे. कथा बळकट नाही. दिग्दर्शक अ‍ॅक्शन आणि रोमान्समध्ये संभ्रमित झालेले दिसले. चित्रपटातील अ‍ॅक्शन खूपच चांगला दाखवला आहे. पण रोमॅन्स काही जमला नाही असे वाटते. उत्तम एडिटिंगचाही अभाव जाणवतो.

संगीत –
चित्रपटात अनेक हिट गाणी आहेत. रिलीज होण्यापूर्वीच तीन गाणी हिट झाली आहेत. साहो ही संगीताच्या बाबतीत हिट आहे. लोक गाण्यांनाही पसंत करतात. गाण्यातील श्रद्धा-प्रभासची केमिस्ट्री लोकांना आवडली आहे. परंतु संपूर्ण चित्रपट आपले मनोरंजन करणार नाही.

बजेट –
चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित रेड्डी यांनी केले असून ते तेलुगू उद्योगातील नामांकित चित्रपट निर्माते व लेखक आहेत. चित्रपटाचे बजेट 350 कोटी असल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट सुमारे ३000 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला बम्पर ओपनिंग मिळेल, असा व्यापार तज्ज्ञांचा मत आहे. ‘अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम’ ( 53 कोटी) आणि आमीर खानच्या ठग्स ऑफ हिंदोस्तान (5२.२5 कोटी) चित्रपटांचे रेकॉर्ड पहिल्याच दिवशी हा चित्रपट मोडेल.

साहो – ३ स्टार

आरोग्यविषयक वृत्त –