शिवसेनेची PM मोदींवर टीका, परत-परत तेच ते भाषण केल्याने टाळ्या मिळतील, पण मतदान नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने निकालानंतर भाजपपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत जास्त जागा मिळून देखील भाजपला विरोधात बसण्याची वेळ आली. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेने भाजप नेत्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पुन्हा तेच ते भाषण केल्यामुळे टाळ्यांचा कडकडाट होतो, पण मतदान होत नाही असा टोला लगावला आहे.

सामनाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने सीएए आणि कलम 370 वर प्रश्न उपस्थित केले आहेत. अग्रलेखात म्हटले आहे की, भाजप नेतृत्वात असलेल्या सरकार कलम 370 आणि सीएएचा राजकीय फायदा उठवत आहे. त्यासाठी भाजप नेतृत्वात असलेले सरकार राजकीय फायदा उठवण्यावर काम करत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या भाषणावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामध्ये कलम 370 आणि सीएएवरून मागे हटणार नसल्याचे पंतप्रधान यांनी म्हटले आहे. तसेच दिल्लीमध्ये भाजपचा पराभव झाला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिशा बदलण्याची गरज आहे. एकच भाषण सारखे सारखे केल्याने लोक टाळ्या वाजतात. मात्र, मतदान करत नाहीत. हेच दिल्लीच्या निवडणुकीत दिसून आले, असा टोला सामनाच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.