अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू साकारणार 60 वर्षांच्या दादीची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांचा आगामी सिनेमा सांड की आँख चा फर्स्ट लुक समोर आला आहे. भूमी आणि तापसी दोघीही एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. दोघींच्या हातात पिस्तुल दिसत आहे. या पोस्टरद्वारे हेदेखील सांगितले आहे की, हा सिनेमा दीवाळीला रिलीज होणार आहे.

शुटर दादी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाची कथा आहे. या दोघीही एकमेकींच्या जावा आहेत. सिनेमाचं पोस्टर पाहिलं तर लक्षात येतं की, तापसी आणि भूमी दोघीही वृ्द्ध महिलांची भूमिका साकारणार आहे. परंतु पोस्टर नीट पाहिले तर लक्षात येते की, सिनेमाच्या टीमने त्यांच्या लुकवर जास्त मेहनत घेतल्याचे दिसत नाही. सिनेमाचा फर्स्ट लुक काही अंशी निराशा करणारा आहे असे जाणवते.

याआधीही या सिनेमाचे काही पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या सिनेममाच्या पोस्टवर लिहण्यात आलेल्या ओळी खूपच जबरदस्त आहेत. तन बुड्ढा होता है मन बुड्ढा नही होता असे या पोस्टवर लिहिण्यात आले आहे. आणखी एका पोस्टरवर असे लिहिण्यात आले आहे की, या दोघींनीही आजपर्यंत जवळपास 700 मेडल्स जिंकले आहेत. तापसीने हा पोस्टर शेअर करताना लिहिले आहे की, “इस दीवाली पटाखे नही गोलियां चलेगी”