‘दिखा अपनी बत्तीसी’ ! तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकरचा ‘सांड की आँख’चा ट्रेलर रिलीज (व्हिडीओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर सिनेमा सांड की आँखचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात तापसी पन्नू वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. भूमी आणि तापसी यांनी पहिल्यांदाच 50 वर्षांच्या वृ्द्धेची भूमिका साकारली आहे. सध्या या सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे.
तापसी पन्नू ट्विटरवर ट्रेलर शेअर करताना म्हणते, “आ गया… मेहनत से हमारा प्यार… लेकिन ये वाला हम सब की माताओं को समर्पित है।” युट्युबवर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. काही तासांतच हा ट्रेलर व्हायरल झाल्याचे दिसत आहे.
Here it is… our labour of love …
But this one is dedicated to all the mothers….#SaandKiAankh https://t.co/UPViMsyTMB— taapsee pannu (@taapsee) September 23, 2019
हा सिनेमा वुमन सेंट्रीक आहे आणि महिलांच्या कार्याचं कौतुक करणारा आहे. तुषार हिरानंदानी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. या सिनेमात दाखवलं आहे की, महिला आपल्या घर आणि कुटुंबासाठी खूप काही करतात. परंतु त्यांना जास्त करून ते क्रेडिट दिलं जात नाही. जेव्हा महिला आपल्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा समाज त्यांना रोखण्याचा आणि मर्यादा घालण्याचा प्रयत्न करतो. या मर्यादा तोडून महिला नवीन जागतिक स्तरात आपलं आणि गावाचं नाव करतात. दोन 50 वर्षीय आजींनी बंदूक हातात घेऊन 352 मेडल्स जिंकण्याची ही कथा आहे.
Daadiyo ki sawaari nikal chuki hai….. #SaandKiAankh
Trailer in a few hours pic.twitter.com/QOu19ahxAr— taapsee pannu (@taapsee) September 23, 2019
शुटर दादी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाची कथा आहे. या दोघीही एकमेकींच्या जावा आहेत. हा सिनेमा 25 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. हा सिनेमा हाऊसफुल आणि इतर सिनेमांशी क्लॅश होण्याचा अंदाज आहे.
https://youtu.be/-uA-ONin_5M
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय
- ‘डेंग्यू’ पासून संरक्षण करतील ‘पपईची पाने’, जाणून घ्या कसा करावा उपाय
- जनावरांसाठीही डास धोकादायक ! दूध उप्तादनावर होतो वाईट परिणाम
- डेंग्यूच्या डासांची ‘ही’ माहिती आवश्य जाणून घ्या,
- लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत
- डासांमुळे मलेरियासह होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच घ्या काळजी
- अनेक आजारांवर अडुळसा आहे ‘रामबाण औषध’, जाणून घ्या उपाय