Saba Azad | सबा आझादच्या लूकवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले “स्वस्तातली कंगना ……”

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) हे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक कार्यक्रमात देखील या दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. एका इव्हेंटमध्ये या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी मात्र सबा आझादला (Saba Azad) ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

‘रॉकेट बॉईज 2’ या वेब सिरीजच्या स्क्रीनिंगला ऋतिक आणि सबाने हजेरी लावली होती. या सिरीजमध्ये सबा देखील झळकणार आहे. या स्क्रीनिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ऋतिक आणि सबा फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वायरल होताच यावर अनेक कमेंट पाहायला मिळाले. अनेकांनी सबाला स्वस्तातली कंगना असे देखील म्हटले आहे.

कंगना आणि ऋतिक मधील मतभेद हे जगजाहीर आहेत.
कंगना ऋतिक सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले होते, मात्र हे वृत्त अभिनेत्याने नकारले होते.
यानंतर दोघांनी माध्यमांसमोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
त्यात आता त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजेच सबाला (Saba Azad) कंगनाची स्वस्तातली कॉपी म्हणत
नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. या व्हिडिओवर “ही कंगनाची स्वस्त कॉपी”,”कंगना 2.0″,
“‘हिच्यापेक्षा कंगना छान होती’ अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

Web Title : Saba Azad | hrithik roshan girlfriend saba azad trolled over her look like kangana ranaut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई