शबरीमला मंदिरप्रवेश : खासदार, नेत्यांच्या  घरावर बॉम्बहल्ला

थिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ केरळमध्ये हिंसाचार उफाळला आहे. शुक्रवारी रात्री उशिराने सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा (एम) चे नेते आणि खासदार ए. एन शमसीर यांच्यासह अन्य नेत्यांच्या घरावर बॉम्ब हल्ले करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कन्नूर जिल्ह्यातल्या थलासरीमध्ये ही घटना घडली. माकपचे आमदार ए. एन. शमशीर आणि नेते पी. शशी यांच्या घरावर रात्री गावठी बॉम्बने हल्ला करण्यात आला. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास बाईकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी आमदार शमशीर यांच्या घरावर बॉम्ब फेकून पळून गेले. थलासरीत आयोजित करण्यात आलेली शांतता सभा सुरू असताना शमशीर यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.  हा हल्ला म्हणजे कट असून वातावरण आणखी तणावपूर्ण व्हावे यासाठीच हा हल्ला करण्यात आला असल्याचा संशय आमदार शमशीर यांनी केला. भाजपला या हल्ल्याबद्दल माहिती असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना हल्ल्याची माहिती दिली.
माकप नेते शशी यांच्या घरावरही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला. यात घराचे नुकसान झाले. तर, इरिट्टी परिसरात एका माकप कार्यकर्त्यावर चाकूने वार करण्यात आले. थलासरीतच माकपच्या विभागीय समितीचे सदस्य व्ही. शशी यांच्यावर सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास चार बाईकस्वारांनी हल्ला केला. यानंतर घरावर देशी बॉम्ब फेकले व घरातील सामनाची नासधूस केली. यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. या हल्ल्याच्या काही वेळेनंतर थिरुवनगाड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते के. चंद्रशेखरन यांच्या घरावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, केरळमध्ये हिंसाचार वाढत असून आतापर्यंत १७१८ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
You might also like