#Loksabha : संभाजी ब्रिगेड लोकसभेच्या रिंगणात ; माढ्यात दिला ‘हा’ उमेदवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर सर्वच पक्षांमध्ये जोरदार तयारीही सुरु झाली आहे. त्यावर आता लोकसभेच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड उतरणार आहे. लोकसभेत संभाजी ब्रिगेड शिवसेना-भाजप युतीला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करणार आहे, पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

लोकसभेत संभाजी ब्रिगेड युतीला आणि आघाडीला प्रखर विरोध करणार आहेत. सोलापूर, पुणे, माढा, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद या मतदार संघांसह १८ जागांवर लोकसभा लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, माढ्याची जागा सध्या चर्चेत आहे. त्यात ब्रिगेडने विश्वंभर काशिद यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. माढ्यातून लोकसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. त्यानंतर विश्वंभर काशिद यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मसूदला दिली होती क्लिन चीट : काॅंग्रेस 

#Loksabha : गिरीश बापट यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा 

युतीच्या ‘त्या’ नव्या धोरणामुळे काही जणांच्या उमेदवारीला कात्री ? 

#Loksabha : 10वी, 12वीच्या शिक्षकांना निवडणुक आयोगाचा दिलासा 

जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले