14 व्या वाढदिवसाच्या दिवशीच घेतला जगाचा निरोप, ‘रसना गर्ल’ ‘तरुणी’नं मृत्यूपूर्वीच केली होती भविष्यवाणी ! नंतर झाली खरी

14 मे 1998 रोजी मुंबईत जन्मलेली अभिनेत्री तरुणी सचदेव हिला आपण सारेच ओळखतो. तरूणी एक इंडियन मॉडेल आणि बाल अभिनेत्री होती. तिचे वडिल उद्योगपती असून त्यांचे नाव हरेश सचदेव आहे तर आईचं नाव गीता आहे. मुंबईतच तरुणीनं शिक्षण घेतलं आहे. तिची आई मुंबईच्या इस्कॉनमधील राधा गोपीनाथ मंदिरातील धर्माभिमानी मंडळाची सदस्य होती.

तरुणी अवघ्या 5 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत आली होती. ती त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी बाल कलाकार होती. रसनाच्या जाहिरातीनं खूप फेमस झाली होती. तिला सर्वात व्यस्त बाल मॉडेल मानलं जात होतं. तिनं रसनासह, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स मोबाईल, एलजी, कॉफी बाईट, गोल्ड विनर, शक्ती मसाला अशा अनेक जाहिरातीत काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B_aX6C6FcGH/

14 मे 2012 रोजी तरुणीचं निधन झालं. अग्नि एअर फ्लाईटच्या सीएचटी विमान अपघातात तरुणी आणि तिची आई गीता यांचा मृत्यू झाला. खास बात अशी की, त्याच दिवशी तिची 14 वा वाढदिवस होता.

मस्करीत घेतला होता मित्रांचा शेवटचा निरोप

11 मे 2012 रोजी तरुणी नेपाळला चालली होती. तिनं जाण्याआधी तिच्या सर्व मित्रांना मिठी मारली. ती म्हणाली की, मी तुम्हा सर्वांना शेवटचं भेटत आहे. तसं तर हा एक विनोद होता. तिच्या मित्रांनीअसंही सांगितलं की, तरुणीनं याआधी कधी मिठी मारली नव्हती. कोणत्याही सहलीवर जातानाही तिनं कधी असा निरोप घेतला नव्हता. ती मित्रांना म्हणाली की, उड्डाणापूर्वीच विमान क्रॅश झाले तर… मित्रांना आय लव्ह यु बोलत ती निघून गेली आणि पुन्हा कधी आलीच नाही.

तरुणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2004 साली आलेल्या वेल्लीनक्षत्रम या मल्याळम सिनेमातून तिनं डेब्यू करत तिनं फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. स्टार प्लसवरील शो क्या आप पांचवी पास से तेज है ? या शोमध्येही ती सहभागी झाली होती. त्यावेळी शाहरुख खान हा शो होस्ट करत होता. तिनं अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. रसनाच्या जाहिरातीमुळं ती खूप फेमस झाली होती.