राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना योग्य वाटला : सचिन अहिर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाला सोडण्यापूर्वी शरद पवार यांना न सांगाता पक्ष सोडल्याचे बोलले जात होते. मात्र, एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी आपण शरद पवारांना भेटलो असल्याचे सांगत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटलो होतो. त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना न सांगता अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला अशी चर्चा होती. अखेर यावर अहिर यांनी खुलासा केला आहे.

खुलासा करताना आहिर म्हणाले, राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी शरद पवारांना आपण पक्ष सोडत असल्याचे सांगता आले नाही. मात्र, त्यांना निरोप पाठवून आपला निर्णय सांगितला. शिवसेनेत प्रवेश करण्याच्या एक दिवस अगोदर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांशी बोललो होतो. काही नेत्यांचा आग्रह होता तुम्ही जाऊ नका. तर काहींचा निश्चतपणे होता. तुमचा निर्णय जर तुमच्या राजकीय करीअरला पोषक असले तसेच तुमच्या कार्यकर्त्यांसाठी योग्य असेल तर तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असे काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचे अहिर यांनी सांगितले.

साहेबांविषयी आदर राहील

राष्ट्रवादी काँग्रस पक्ष सोडला असला तरी शरद पवार साहेबांविषयी माझ्या मनात आदर राहिल. ते कुठेही भटेले तरी त्यांच्यासमोर हात जोडूनच उभा राहीन असेही सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले. पण आपण पक्ष सोडत असल्याचे साहेबांच्या कानावर घातले असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला.

आरोग्यविषयक वृत्त