Sachin Ahir | ‘पीएला त्यांनी जी पदं दिली, आज त्याच पदावर त्यांना समाधान मानावे लागत आहे’; ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची विजय शिवतारे यांच्यावर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेतील (Shivsena) फूटीनंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात सामील झालेले नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे शिवसेनेत असताना मोठे नेते म्हणून वावरत होते. मात्र एकेकाळी साधा कार्यकर्ता किंवा पीएला त्यांनी जी पदं दिली, आज त्या पदावर त्यांना समाधान मानावे लागत आहे.’ अशी टीका ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली आहे.

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना शिंदे गटाकडून जिल्हा नियोजन समितीचे तज्ज्ञ (District Planning Committee Expert) असे पद देण्यात आले आहे. यावरून बोलताना सचिन अहिर यांनी विजय शिवतारे यांना चांगलाच टोला लगावला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर दौऱ्यावर असताना निरा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय शिवतारे यांच्यावर टीका केली.

त्यांना हे पद दिल्यामुळे हा एकप्रकारे पुरंदरच्या जनतेचा अपमान आहे, विजय शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रिपदाच्या समतुल्य महामंडळ मिळायला हवे होते, पण तसं काहीच झालं नाही. असा टोला त्यांनी यावेळी बोलताना विजय शिवतारे यांना लगावला.

यावर पुढे बोलताना सचिन आहेर (Sachin Ahir) म्हणाले की,
‘आगामी जिल्हा निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे.
मात्र, यात आघाडीचा जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. मात्र तरीदेखील स्वबळाची तयारी ठेवली पाहिजे.
त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिसरात, गणात आज आम्ही आलो आहोत.
त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधून आपण आगामी निवडणूक स्वबळावर लढावी.
असा निर्धार करण्यात आल्याचे यावेळी बोलताना सचिन अहिर म्हणाले.

Web Title :- Sachin Ahir | shivsena sachin ahir taunts balasahebanchi shivsena leader vijay shivatare

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Maharashtra Politics | नक्की कोण करतयं बीडच्या राजकारणात ढवळाढवळ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Pune Crime News | 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात FIR