Sachin Ahir | …तर पुणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवणार : सचिन आहिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मनपा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये (Election) शिवसेना (Shivsena) समान जागा लढवेल. अन्यथा स्वतंत्र लढण्याचा पर्याय आमच्यासाठी खुला असल्याचे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी सांगितले. शिवसेनेचे युवानेते देवेंद्र भाट (Devendra Bhat) यांनी दीपावली निमीत्त घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण सचिन आहिर (Sachin Ahir) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केशवनगर-मुंढवा परिसरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar),नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire), शहर प्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख विजय देशमुख,
उपशहर प्रमुख समीर तुपे, हडपसर विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, शहर उपसंघटक जाण मोहंमद, सागर मोराळे, संजय सपकाळ, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे,
माजी उपसरपंच संजय गायकवाड, काँग्रेस नेते रमेश राऊत, विक्रम लोणकर, अप्पासाहेब व्यवहारे, निलेश गौडा, उमेश भाट, श्रीकांत बोरा,
भरत शेंडकर, जितेंद्र लोणकर, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 

सचिन आहिर (Sachin Ahir) पुढे म्हणाले, मनपा निवडणुकीच्या (Municipal election) पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत
(Pune Municipal Corporation) शिवसेनेचा महापौर (Mayor) अथवा उपमहापौर करण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
देवेंद्र भाट यांनी सामाजिक उपक्रमांमधून केशवनगर-मुंढवा परिसरात शिवसेना मजबूत करण्याचे काम केले आहे.
त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray),
शिवसेना आणि मी स्वतः त्यांच्या पाठीशी असल्याचे सचिन आहिर यांनी सांगितले.

 

नव्यानं पुणे मनपा हद्दीत समाविष्ट झालेल्या केशवनगर परिसरात नागरी समस्यांनी गंभीर रूप धारण केले आहे.
या भागात विकासकामांची गंगा आणण्यासाठी मनपा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालो
असून सर्व ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी पाठीशी उभे राहावे असे आवाहन यावेळी आयोजक देवेंद्र भाट यांनी केले.

यावेळी किल्ले स्पर्धामधील विजेत्यांना सायकल व भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या. क्रीडा, वारकरी संप्रदाय, धार्मिक, इतिहास, सांस्कृतिक,
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुंढवा- केशवनगर शिवसेना शाखेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मातोश्री प्रतिष्ठानचे सदस्य व देवेंद्रदादा भाट मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. आभार समीर तुपे यांनी मानले.

 

Web Title : Sachin Ahir | … then Pune Municipal Corporation will contest elections independently – shivsena leader Sachin Ahir

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | … म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार देता आले नाहीत – अजित पवार

Bombay High Court | लैंगिक शोषणातील दोषीची सुटका ! ‘अल्पवयीनाच्या साक्षीवर विश्वास ठेवणे अवघड’ – मुंबई हायकोर्ट

H V Desai Eye Hospital | PBMA च्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालायत OPD चे उद्घाटन