Sachin Ahir | महाआघाडी करण्याची इच्छा, मात्र नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी – सचिन अहिर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sachin Ahir | पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दौरा केला. यावेळी ठाकरे यांनी प्रशासकीय बैठकीसह शिवसेना पक्षाच्या (Shiv Sena) नेत्यांशी देखील चर्चा केली आहे. जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांची बैठक घेत पक्षीय संघटना मजबूत करण्यावर त्यांनी चर्चा केल्याची माहिती संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याची आमची इच्छा आहे, मात्र तसे न झाल्यास आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. असं अहिर यावेळी म्हणाले. पक्ष कार्यकर्त्यांसाठी व्यासपीठ तयार करण्याचं काम आम्ही करत आहोत. शिवसेना मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यावर आम्ही भर देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

दोन्ही महापालिकेतील (Pune Corporation) परिस्थिती पाहिली तर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक एकमेकांवर भष्ट्राचाराचे आरोप करत आहेत.
त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Corporation) शिवसेना हा जनतेसाठी उत्तम पर्याय असल्याची भावना जनतेमध्ये आहे,
असं सचिन अहिर (Sachin Ahir) म्हणाले.

दरम्यान मनसे भाजप युतीच्या (MNS-BJP) चर्चेवर त्यांना विचारलं असता,
मनसेचे आजवरची भूमीका कोणाला पोषक आहे हे पाहिल्यास सर्वकाही दिसून येत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Web Title :- Sachin Ahir | Willingness to form a grand alliance, but if not, ready to fight on one’s own – Sachin Ahir

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court | अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ ! चिंचवडमधील शिक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी; 50 हजार रूपये दंडाची शिक्षा

Pune Corporation | लस आहे तर ती द्यायला सिरींजच नाहीत ! पुणे महापालिकेच्या लसीकरणात अडथळ्यांची शर्यत

Pune Court | ‘या’ प्रकरणात गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला