Coronavirus Lockdown : अभिनेते सचिन पिळगावकर संतापले, म्हणाले – ‘थोडं तरी डोक्याचा वापर करा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशासह राज्यात कोरोनामुळे लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर अनेकजण अजूनही रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. वारंवार आवाहन करूनसुद्धा काही लोक ऐकायला तयार नाहीत. अशा लोकांवर अभिनेते सचिन पिळगावकर संतापले आहेत. ‘थोडे तरी डोक्याचा वापर करा’, असे म्हणत त्यांनी बाहेर फिरणार्‍या लोकांना सुनावले आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लोकांना आवाहनसुद्धा केले आहे.

कोरोना व्हायरस स्टेज 2 वरून स्टेज 3 वर गेला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपल्या सर्वांना विनंती करत आहेत. तुम्ही घरी राहा. पण काही लोक ऐकायलाच तयार नाहीत. मी असे म्हणत नाहीये की लोक घरात थांबले नाहीत. असंख्य लोक घरात थांबले आहेत जे बुद्धिजीवी आहेत. पण काही लोक कोणाचेही ऐकत नाहीयेत. थोडे तरी डोक्याचा वापर करा. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांच्या कुटुंबीयांना सोडून आपल्याकरिता रोज मेहनत करत आहेत. त्यांना कुटुंबीय नाही का? तरीही सगळे सोडून काम करतायत. थोडे तरी डोक वापरा आणि घरीच थांबा, असे त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.