सचिन पायलट यांनी घेतली राहुल-प्रियंका यांची भेट, विधानसभा अधिवेशनापूर्वी ‘घरवापसी’चे प्रयत्न ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राजस्थानमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राजकीय हालचाल तीव्र झाली आहे. पक्षात बंडखोरी करणारे सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट घेतली आहे. या तिघांमधील बैठक सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे, सचिन पायलट यांना काँग्रेस पटवून देण्यात यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत.

कॉंग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष हायकमांडने सचिन पायलट यांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील. राजस्थानमध्ये विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासूनच सुरू होणार आहे, त्यापूर्वी सचिन पायलट गटाने अधिवेशनात सहभागी होण्याचे संकेत दिले होते.

आता प्रियंका आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सचिन पायलट आपली नाराजी विसरून पक्षात परततील अशी अपेक्षा आहे. सचिन पायलट यांनी बंड पुकारण्यापूर्वी त्यांचे प्रियंका गांधी वाड्रा यांच्याशी फोनवर बर्‍याच वेळा बोलणे झाले होते आणि त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

यापूर्वी सोमवारीच ही बाब समोर आली होती की, राजस्थानच्या गेहलोत गटातील आमदारांनी मागणी केली आहे कि बंडखोर आमदारांवर कारवाई करावी, जी प्रभारी अविनाश पांडे यांनी मान्य केली होती.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात होती दरार

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध मोर्चा काढणारे सचिन पायलट यांच्यासह सुमारे २२ आमदार होते. राज्य सरकारने त्यांच्यावर सरकार पाडण्याचा आरोप केला होता आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे सचिन पायलट खूप नाराज झाले होते, त्यांच्या बंडखोरीनंतरच कॉंग्रेसने सचिन यांच्याकडून उपमुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले होते.

सीएम अशोक गहलोत यांच्या वतीने असा आरोप केला गेला होता की, सचिन पायलट भारतीय जनता पक्षासह सरकार पाडण्याच्या प्रयत्नात होते, फोन टॅप करण्यासारखे अनेक पुरावे असल्याचा दावा केला होता.

मात्र एकीकडे अशोक गहलोत सचिन पायलटवर सतत निशाणा साधत होते, तर दुसरीकडे कॉंग्रेस हायकमांड त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न करत होता. राहुल-प्रियंका यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी सचिन पायलटशी बोलण्याचा प्रयत्न केला, वारंवार झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये सचिन पायलट यांना परत येण्याचे आमंत्रण देण्यात आले.