Sachin Sawant | फडणवीसांच्या कामगिरीबाबत केलेला ‘तो’ दावा खोडून काढत काँग्रेसचा भाजपवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sachin Sawant | भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकालासंदर्भात केलेला दावा आता काँग्रेसनं खोडुन काढला आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत (Sachin Sawant) यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. खोट्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाजपा नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत, असं सचिन सांवत (Sachin Sawant) यांनी म्हटलं आहे.

सचिव सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही मानकात महाराष्ट्र 5 व्या स्थानावर होता, हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद असून वस्तुस्थितीला धरून नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की, फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र 2015 साली 8 व्या स्थानी, 2016 साली 10 व्या स्थानावर तर 2018 साली 13 व्या स्थानावर होता.
कोरोना नसताना ही अधोगती होती हे विशेष. खोटं बोल पण रेटून बोल यात भाजपा तरबेज असून भातखळकर हे रा. स्व. संघाकडून दीक्षा घेऊन बेफाम खोटं बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी आहेत, असं ते म्हणाले.

पुढे सचिन सांवत म्हणाले की, ‘ऑगस्ट महिन्यात जुलैपेक्षा GST उत्पन्नात 3728 कोटी रुपयांनी घट झालीय, असं दुसरं धादांत खोटे वक्तव्य भातखळकर यांनी केलंय.
प्रत्यक्षात एप्रिलमध्ये राज्याचा GST 12350 कोटी रुपये, मे महिन्यात 7983 कोटी रुपये, जूनमध्ये 8349 कोटी रुपये, जुलैमध्ये 11388 कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये 12644 कोटी रुपये असून या
कालावधीत एकूण 52714 कोटी रुपये उत्पन्न झालेलं आहे.
जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात GST उत्पन्न वाढलं आहे.
त्यामुळे भातखळकर खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होतं, असा आरोप त्यांनी केलाय.

 

पुढे सचिन सांवत म्हणाले, ‘महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले.
लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.
म्हणूनच 2020-21 या आर्थिक वर्षातील पहिल्या 5 महिन्यांत जितके जीएसटी उत्पन्न मिळाले होते त्यात या वर्षी 67.29 % वाढ झालीय.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप (BJP) नेते करत असतात.
हे सरकार सत्तेवर आल्यापासून करोनासह नैसर्गिक संकटांचा सामना सातत्याने करत असतानाही राज्याच्या विकासाची गती थांबू दिलेली नाही.
महाविकास आघाडी सरकारवर जनतेसह उद्योग क्षेत्राचाही विश्वास असल्याचं सांवत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : sachin sawant | congress leader sachin sawant slams bjp mla atul bhatkhalkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | खळबळजनक ! एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 3 दिवसात एक-एक करीत सदस्यांनी सोडला प्राण

Jayant Patil | राजू शेट्टी आमदार होणार की नाही?; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अन् मंत्री जयंत पाटील म्हणाले…

Aadhaar Card केंद्र चालक जास्त पैसे मागत आहे का? जाणून घ्या कुठं अन् कशी करावी तक्रार