Sachin Sawant | ‘लंपी ने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मिडीया भक्त आणि भाजपा नेते मात्र…’, काँग्रेस नेते सचिन सावंतांची मोदी सरकारवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातून 1952 साली नामशेष झालेले चित्ते (Cheetah) तब्बल 70 वर्षांनंतर भारतात परतले आहेत. या चित्याना मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) सोडण्यात आले आहे. नामिबियातून (Namibia) 8 चित्ते भारतात आणण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाढदिवसाचं औचित्य साधून त्याच्या हस्ते या चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात आले. यानंतर अनेक राजकीय पक्षांनी भाजपवर (BJP) टीका करण्यास सुरुवात केली. यावरून काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजप (BJP) आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले सचिन सावंत?
सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भाजप आणि मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये “लंपीने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मीडीया, भक्त आणि भाजपा नेते मात्र बोलती… चित्ता ता चिता चिता चित्ता ता ता” असे म्हणत निशाणा साधला आहे. यावरून राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील “चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता” अशी जोरदार टीका केली आहे.

 

रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?”
या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात… महागाईचे, बेरोजगारीचे, कायदाव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे .. पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?, याऐवजी वेदांताचं काय होणार ते सांगा?” असा सवाल अजित पवार यांनी भाजपला विचारला आहे.

 

Web Title :- Sachin Sawant | congress sachin sawant slams bjp and narendra modi over cheetah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आपल्या परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

IND vs AUS | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या तिकीट खरेदीसाठी रांग ! चाहत्यांवर लाठीचार्ज