शासकीय जागेत सराईत गुन्हेगार सचिन शिंदेच्या दशक्रिया फलक लावणाऱ्यावर FIR

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे या सराईत गुन्हेगारावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन खून केला होता. गोल्डन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन शिंदे याचा दशक्रिया विधीचा फलक विनापरवाना शासकीय जागेत लावल्याचे समोर आल्यानंतर आता हा फलक लावणाऱ्या व्यक्तीवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोन्या उर्फ शुभम अशोक भंडारे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

दहा दिवसांपूर्वी लोणीकंद यथे ॲक्सिस बँकेच्या एटीएम समोर गप्पा मारत असताना सचिन शिंदे याच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळ्या घालून खून केला होता. या घटनेनंतर अनेक ठिकाणी सचिन शिंदे याच्या दशक्रिया विधीचे फलक लावण्यात आले होते. 13 फेब्रुवारी रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे वडु बुद्रुक गावात गस्त घालत असताना त्यांना गावातील के एम हॉस्पिटलसमोर शासकीय जागेत रोडच्या कडेला शुभम भंडारे याने फलक लावल्याचे दिसले.

परिसरातील बाह्य स्वरुप कमी करुन तेथील जागेच्या सैदर्यास हानी पोहचेल अशा पद्धतीने त्या जागेचे विद्रुपीकरण करुन निसर्ग सौदर्यात बाधा आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोन्या उर्फ शुभम भंडारी याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मांजरे हे करीत आहेत.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय जागेत विना परवाना खासगी कार्यक्रमाचे फलक लवून नयेत. विना परवाना फलक लावल्याचे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणीही विना परवाना फलक, फ्लेक्स व बोर्ड शासकीय जागेत लावून नयेते असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.