पुणे शहर पोलीस दलातील सचिन शिंदे यांचे नेत्रदीपक यश

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या शरिरसौष्ठव स्पधेत पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकवला. शुक्रवारी (दि.७) झालेल्या या स्पर्धेमध्ये सचिन शिंदे यांनी ६५ ते ७० वजनीगटात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशामुळे पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
[amazon_link asins=’B0751C1WGF,B074GY4DSL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9f2bf87-b51c-11e8-a476-8163611deecf’]

नाशिक येथील स्पर्धेत यश संपादन केल्यानंतर सचिन शिंदे यांची जयपुर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पोलीस स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. सचिन शिंदे यांनी यापूर्वी पुणे श्री गोल्डमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. तर २००३ ते २००४ दरम्यान खालसा यूनिवर्सिटी पंजाब, ज्युनिअर मिस्टर इंडिया, सिल्व्हर पुणे, मिस्टर इंडिया सहभाग, जालंधर पंजाब येथे सहभाग घेतला होता. तसेच २०१४ साली झालेल्या नाशिक येथील महाराष्ट्र श्री स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता.

सचिन शिंदे हे पुणे शहर पोलीस दलात २००५ साली भरते झाले. पोलीस दलातील तणावाच्या नोकरीतूनही त्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पोलीस खात्याचे काम संभाळून मिळेल त्या वेळेमध्ये आपली शरीरयष्टी मजबूत केली. सचिन शिंदे यांनी मिळवलेल्या यशा बद्दल अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरिष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -२ भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी