‘मास्तर ब्लास्टर’ म्हणाला, जर विराटने माझा १०० शतकांचा ‘रेकॉर्ड’ तोडला तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विराटसध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळेच त्याने विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी केली. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं ४२ वं शतक आहे. वर्ल्डकप वेळी त्याला एकही शतक करता आलं नव्हतं. एका शतकासाठी त्याला तब्बल 11 सामने वाट पहावी लागली. या शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटची ६७ शतकं झाली आहेत.

आतापर्यंत मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलरचेच फक्त १०० शतकांचे रेकॉर्ड आहे त्यामुळे विराटच्या ४२ व्या शतकानंतर सचिन म्हणाला की, विराटने माझे रेकॉर्ड तोडले तर मी त्याच्यासोबत शॅम्पेन शेअर करेल. कॅप्टन विराट कोहलीचं वेस्ट इंडिजविरुद्ध हे  ८ वं शतक आहे. त्रिनिदादमध्ये झालेल्या सामन्यात विराटनं सचिनचा एक विश्वविक्रम मोडला, त्यानं श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध ८ पेक्षा जास्त शतकं केली आहेत. तो पहिलाच असा खेळाडू आहे ज्यानं तीन देशांविरुद्ध ८ पेक्षा जास्त शतकं केली. सचिननं ऑस्ट्रेलिया आणि लंकेविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

विराटच्या कामगिरीवर एक नजर –

विराट कोहलीने ११ हजार ३६३ धावा करणाऱ्या सौरभ गांगुलीला मागे टाकले. कोहलीनं २३८ सामन्यात ५९.७१ च्या सरासरीनं ११ हजार ४०६ धावा केल्या आहेत. तर, सगळ्यात जास्त धावा करण्याचा विक्रमही अजूनही सचिनच्या नावावर आहे. सचिननं ४६३ सामन्यात १८ हजार ४२६ रन होते.

तर विराट कोहली हा सगळ्यात जास्त शतक मारणार कर्णधार ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनं न्यूझीलंड विरोधात सर्वात जास्त ५ शतक लगावले होते. तर विराटनं वेस्ट इंडिज विरोधात कर्णधारपदी असताना ६ शतक लगावली आहेत. विराट कोहली सर्वात कमी डावांमध्ये २ हजार धावा करणारा खेळाडू आहे, या आधी हा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर होता.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like