#Friendship Day2019 : ‘कांबळया’, मला आपल्या शालेय जीवनातील जुना फोटो सापडलायं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री ही भारतीय क्रिकेटची सर्वात प्रसिद्ध मैत्री आहे. मैत्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही खेळाडूंनीही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सचिन आणि कांबळी हे दिग्गज क्रिकेटर प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य आहेत. शालेय मैत्रीनंतर हे दोघे अजूनही जवळचे मित्र आहेत. मध्यन्तरी जरी दोघांमध्ये काही दुरावा निर्माण झाला असला तरी पण आता दोघे पूर्वीप्रमाणे ‘जय-वीरू’ झाले आहेत.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही बर्‍याचदा जुन्या दिवसांतील फोटो आणि आठवणी शेअर करतात. आता फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला आज शनिवारी सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीसोबत आपल्या शाळेतील दिवसांचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत सचिनने एक भावनिक संदेशही लिहिला आहे. तसेच विनोद कांबळीने जुन्या आठवींना उजाळा दिला आहे.

सचिन तेंडुलकरने विनोद कांबळी सोबतचा फोटो शेअर करून लिहिले की, मला कॉलेजचे दिवस, शाळेच्या दिवसांचे हा फोटो सापडला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत, म्हणून मी हा फोटो शेअर करीत आहे. शालेय क्रिकेट दरम्यान सचिन-कांबळी जोडीनेही नॉट आऊट ६६४ धावांची भागीदारी केली होती. ते एक रेकॉर्ड बनले होते जे अजूनही कोणी मोडू शकले नाही.

सचिनच्या या ट्विटवर कांबळीनेही मजेशीर किस्सा शेअर केला आहेत. जेव्हा आम्ही गोलंदाजी करीत होतो आणि मैदानावर पतंग आला होता. यानंतर मी बॅटिंग सोडून पतंग उडवायला सुरवात केली होती. तू आचरेकर सरांना येताना पहिले पण मला सांगितले नाही. आठवतंय ना. असे म्हणत विनोदने रागाची स्माईली टाकली आहे. सचिनने यावर म्हटले की मी कसा विसरू शकतो. मला त्या दिवसांना खूप मिस करतो.

आरोग्यविषयक वृत्त