‘मास्टर ब्लास्टर’ सचिनची कार चालतीय ‘अ‍ॅटोमॅटीक’, ‘मिस्टर इंडिया’ चालवतोय कार (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पहिल्यांदाच त्यांच्या होम पार्किंगमध्ये अ‍ॅटोमॅटीक चालणाऱ्या कारचा आनंद लुटला. सचिनने शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सचिन ज्या कारवर बसला आहे, ती आपोआप चालते आहे.

या व्हिडिओत दिसते की, एखादा अदृश्य ड्रायव्हर आपली कार चालवित आहे. वास्तविक, या कारमध्ये तो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला नाही, तर ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसला आहे. गाडी स्वत: आपोआपच धावते आणि थांबते. स्वतः ब्रेक लावते. यावर सचिन म्हणाला की, मिस्टर इंडिया (अनिल कपूर) यांनी ही कार चालवत आहे.

त्याने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की – माझी कार गॅरेजमध्ये आपोआप पार्किंग करण्याचा थरारक अनुभव. असे दिसते की मिस्टर इंडिया (अनिल कपूर) यांनी त्याचा ताबा घेतला. मला खात्री आहे की मित्रांसह बाकीचा आठवडादेखील उत्साहात जाईल. सचिन तेंडुलकरला क्रिकेटबरोबरच उत्कृष्ट कार देखील आवडतात. मारुती ८०० ते निसान जीटी-आर आणि फेरारी पर्यंतच्या गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –