‘कोरोना’ला हरवण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनची ‘बॅटिंग’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जगभरात सुमारे दीड लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भारतात त्याचे १४८ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून, या संसर्गामुळे ३ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. हा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात देशभरात पसरत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयच्या वतीने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांडूनही सकारात्मक असा प्रतिसाद मिळत असून, आरोग्य मंत्रालयाच्या मदतीला क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर मैदानांत उतरला आहे. त्यासाठी त्यानं सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकून कोरोना संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी नागरिकंना काही महत्वाच्या सूचना केल्या आहे.

सचिन त्या पोस्ट मध्ये म्हणाला, “आपल्या सर्वांना कोरोनाची भीती वाटत आहे. त्यामुळे आपण स्वतःहून काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाण टाळावे, तसेच गरज नसल्यास लोकांच्या भेटीगाठी टाळा. कारण हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे झपाट्याने प्रसारित होत आहे. आजारी व्यक्तीजवळ जाणे टाळा. तसेच, तुम्हाला स्वतःला आजरी असल्यासारखे वाटल्यास आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधा. २० सेकंड आपले हात स्वच्छ पाण्याने धुवा. घाबरू नका आणि अफवांवर विश्वास नका ठेवू. कोरोना संसर्गाला पराभूत केले जाऊ शकते आणि आपण सर्वांनी मिळून ते करायला हवं.” असे सचिनने म्हटले आहे.