पुन्हा एकदा मैदानावर दिसणार ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन – ब्रायन लारा सारखे दिग्गज, खेळणार T – 20

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कॅरेबियाई दिग्गज ब्रायन लाराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोघंही महान फलंदाज आहेत. पुन्हा एकदा ते आता मैदानावर दिसणार आहेत. सचिन आणि लारा त्या क्रिकेटरपैकी आहेत जे पुढील वर्षी होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळताना दिसणार आहेत.

वर्ल्ड सीरीज टी 20 टूर्नामेंट आहे ज्यात 5 देशांचे रिटायर्ड क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या टूर्नामेंटमध्ये भारताव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, साऊथ अफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत. भारतात 2 ते 16 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या टूर्नामेंटमध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान आणि जोंटी रोड्स यांच्यासह अनेक प्रसिद्ध माजी क्रिकेटर मैदानात उतरणार आहेत.

46 वर्षीय सचिन तेंडुलकर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये जगातील आघाडीचा स्कोर आहे. 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये त्याने 34000हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यात 100 शतकांचा समावेश आहे. ही टूर्नामेंट भारतात खेळवण्यासाठी बीसीसीआयने नुकतीच मंजुरी दिली आहे. बीसीसीआयचं म्हणणं आहे की, या टूर्नामेंटद्वारे भारतात टी 20 क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढेल.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी