#InternationalWomensDay : मराठमोळ्या सचिनचा हटके अंदाज असे दिले पत्नी ,आई आणि मुलीला सरप्राईज 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या या महिलादिनानिमित्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्याच्या आयुष्यातील खास महिलांना जागतिक महिला दिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या घरातील महिलांसाठी खास वांग्याचं भरीत केलं आहे. यासंदर्भातला व्हिडीओ सचिनने ट्विटरवर पोस्ट केला आहे. वांग्याचं भरीत त्याने त्याच्या आईला चाखायला देत ‘चव कशी आहे’ हे देखील विचारले.

सचिनने ट्विट करीत म्हंटले आहे की, ‘हे #WomenDay, आपल्या आयुष्यातील महत्वाच्या महिलांसाठी काहीतरी खास करूया. माझ्यासह सामील व्हा आणि आपल्या गोड भावना शेअर करा.असे म्हणत त्याने आपला स्वयंपाक करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.” आता मी माझ्या आयुष्यातलया खास महिलांसाठी एक रेसिपी करणार आहे. साहजिकच माझ्यासोबत माझी पत्नी अंजली आहे. माझी आई ,पत्नी आणि मुलगी सारा हिच्यासाठी ही खास रेसीपी आहे. असे त्याने म्हंटले आहे. तसेच या तीनही महिला माझ्यासाठी खास आहेत असे सचिनने सांगितले आहे. “.

सचिनचा मराठमोळा अंदाज

या व्हिडीओनिमित्ताने सचिनचा खास मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. सचिनने महाराष्ट्रीयन पद्धतीचे वांग्याचे भरीत तर केलेच पण तो हे सांगायला विसरला नाही की ‘मी लहान असताना माझी आई तासंतास इथे थांबून माझ्यासाठी हे भरीत बनवायची आज तिच्यासाठी हे मी बनवले आहे’. असे सांगून त्याने आपलया आठवणींना देखील उजाळा दिला. सचिनने हे भरीत सर्वप्रथम त्याच्या आईला चाखायला दिले. त्यावेळी त्याने मराठी मध्ये आईशी संवाद साधला. त्याच्या आईंनी देखील ‘चांगलं आहे ‘असे म्हणत सचिनला उत्तर दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us