पावसाने दिला सचिनच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा !

पोलिसनामा ऑनलाईन – पावसात भिजण्याची संधी मुंबईकर कधी सोडत नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील याला अपवाद नाही. सचिनने काल घराच्या खुल्या परिसरात पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसात भिजताना बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिल्याचे त्याने म्हटले आहे. लेक सारा हिने तो पावसात भिजत असताना त्याचा व्हिडीओ तयार केला.

सचिनने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. माझी सर्वात आवडती फोटोग्राफर असलेल्या साराने हा व्हिडीओ शूट केला असून मी पावसाचा आनंद लुटत आहे. पावसाचे थेंब कायमच लहानपण परत आणणात, असे त्याने व्हिडिओला कॅप्शन दिेले आहे.

लॉकडाउन काळात सचिन स्वतःला घरकामात व्यस्त ठेवताना अनेकदा दिसला आहे. घरच्या घरी स्वतःचे आणि मुलाचे केस कापण्याचे कामही त्याने केले. लॉकडाउनच्या अटी शिथिल झाल्यानंतर सचिनने टेनिस खेळण्याचादेखील आनंद लुटला. कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गेल्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला. पण भारतात क्रिकेट सुरू होण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.