सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिला पत्नी मानायचा हा व्यक्ती, अपहरणाची देखील दिली होती धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हीच आज जन्मदिवस आहे. ती जरी बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी नेहमी ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत असते. एका महान फलंदाजांची मुलगी असली तरी तिच्या आयुष्यात घडलेली एक घटना फार महत्वाची आहे. एक व्यक्ती तिच्या मागे लागला होता त्यावेळी सर्वांनाच झटका बसला होता.

पश्चिम बंगालमधील मिदनापूरमधून एक व्यक्ती वारंवार फोन करून साराला त्रास देत असे. त्यामुळे तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र त्याच्या चौकशीत त्याने केलेल्या खुलाश्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले. देवकुमार मैती नावाच्या या व्यक्तीने तिच्या घरी जवळपास 20 फोन करून तिला त्रास दिला तसेच तिला अपशब्द देखील वापरले. तसेच अपहरणाची देखील धमकी दिली होती. चौकशीत या व्यक्तीने सांगितले कि, पहिल्या नजरेतच सारा त्याला आवडली होती.

SARA TENDULKAR
एका स्टेडिअममध्ये सामना पाहत असताना त्याने साराला पाहिले होते. तेव्हापासून तो तिच्यावर प्रेम करतो. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातील एका डायरीमध्ये साराचे नाव त्याने आपली पत्नी म्हणून लिहिले होते. तसेच आपल्या आईवडिलांना देखील त्रास देत असल्याचे तपासात उघड झाले.

दरम्यान, या व्यक्तीने वारंवार त्रास दिल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सारा हिने पोलिसांमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली होती.

Visit : Policenama.com