Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडूलकर आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांची विमानात झाली अचानक भेट, मास्टर ब्लास्टर रमला वीरेंद्र सेहवागच्या आठवणीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sachin Tendulkar-Dharmendra | क्रिकेटचे महागुरू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांची अचानक विमानात भेट झाली. मात्र त्यांची ही झालेली भेट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. दोन्ही कलाकारांनी आपल्या भेटीबद्दल इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोदेखील शेअर केले आहेत. (Sachin Tendulkar-Dharmendra)

 

इन्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोखाली सचिन तेंडुलकरनं लिहिलं की, “आज सर्वात मोठे विरू, धर्मेंद्रजी सोबत भेट झाली! विरूची गोष्टचं वेगळी आहे, सगळे त्याचे चाहते आहेत..! काय म्हणतोस वीरू..” दरम्यान, यावर अजूनही वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

 

विरेंद्र सेहवागचे अनेक भारतीय चाहते आहेत. तसेच त्याला चाहते विरू म्हणून देखील ओळखतात. मात्र ‘शोले’ या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांचा रोल विरू असा होता. तर या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांच्यासोबतच अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan ), हेमा मालिनी (Hema Malini) हे कलाकार देखील होते. धर्मेंद्रचं पात्र विरू हे मात्र चांगलंच गाजलं. त्यामुळे सचिननं विरेंद्रला चिडवण्यासाठी ‘विरू’ या शब्दाचा वापर केला. (Sachin Tendulkar-Dharmendra)

दरम्यान, सचिनच्या या शेअर केलेला पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी कमेंट केलं आहे. तसेच अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) कमेंट करून ‘ओह येस’ असं लिहिलं. तसंच अभिनेत्री ईशानं या पोस्टवर ईमोजी शेअर करून कमेंट केली आहे. तसेच या दोघांच्या झालेल्या या भेटीच्या सोशल मीडियावर तीव्र चर्चा रंगल्या आहेत. चाहते त्यांचे फोटोदेखील प्रचंड प्रमाणात व्हायरल करताना दिसत आहे. एका फोटोमध्ये सचिन धर्मेंद्रचे पाया पडत आपला आदर व्यक्त करत आहे.

 

Web Title :- Sachin Tendulkar-Dharmendra | sachin tendulkar dharmendra meets on flight master blaster posts photo by remembering veeru asked question from virender sehwag

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Chrome User Update | ‘गुगल क्रोम’ केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा

Maharashtra Temperature | वायव्य भारतात थंडीची लाट ! पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट

Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा..

Urfi Javed Viral Photo | उर्फी जावेदनं घातला विचित्र ड्रेस, नेटकरी म्हणाले – ‘आता मच्छरदाणी का घातलीस?’, व्हायरल फोटोमुळे उर्फी झाली ट्रोल..