सचिननं दिला गुरूमंत्र ! टेस्ट क्रिकेटमध्ये ‘बदल’ होऊ शकतात, जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत असलेल्या अ‍ॅशेस मालिकेपासून टेस्ट चॅम्पियनशीप सुरु होत आहे. एक दिवसीय आणि टी -20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर आधारीत या चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये टॉपचे नऊ संघ खेळणार असून त्यांना आपले प्रतिस्पर्धी स्वत: निवडायचे आहेत. प्रत्येक संघाला दोन कसोटी सामने खेळणे बंधनकारक आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानवर होणार असून कसोटी सामना रोमांचक करण्यासाठी आयसीसीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरने कसोटी सामने रंजक करण्यासाठी एक वेगळा पर्य़ाय सांगितला आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये बदल होऊ शकतात.

सचिन तेंडुलकरने एका कार्य़क्रमामध्ये कसोटी क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी काय करावे, हे सांगितले आहे. सचिनच्या मते, कसोटी क्रिकेटसाठी मैदान हे २२ यॉर्डसचे असले पाहिजे. दरम्यान, आपल्या मताचे समर्थन करताना सचिन म्हणाला की, मागील आठवड्यात लॉर्डसवर झालेल्या सामन्यात ज्या प्रकारचे मैदान करण्यात आले होते, त्यामुळे स्मिथ आणि आर्चर यांच्यात चांगली स्पर्धा झाली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे पिच असते, जर तुम्ही पिच चांगले देत असला तर खेळ रोमांचक होतो. गोलंदाजी चांगली होईल आणि फलंदाजांना बॅटिंग करण्यास मजा येईल. हेच लोकांना पहायचे असते, असे सचिन तेंडुलकरने सांगितले. सचिन तेंडुलकर मुंबा हाफ मॅरेथॉनच्या कार्य़क्रमात बोलत होता.

आरोग्यविषयक वृत्त –