‘मास्टर ब्लास्टर’नं कांबळीला दिलं ‘हे’ चॅलेंज, आठवड्यात पूर्ण केलं तर मिळणार ‘असं’ काही (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या एका चॅलेंजमुळे चर्चेत आला आहे. सचिननं त्याचा शाळेतील मित्र विनोद कांबळीला एक चॅलेंज दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे विनोदनं जर हे चॅलेंज एका आठवड्यात पूर्ण केलं तर सचिन त्याला वाट्टेल ते द्यायला तयार आहे.

सचिन आणि सिंगर सोनू निगम यांनी एक गाणं गायलं होतं. याला खूप वर्षे झाली आहेत. हेच गाणं आता सचिननं कांबळीला गायला सांगितलं आहे. यासाठी सचिननं त्याला एका आठवड्याचा कालावधी दिला आहे. जर त्यानं हे गाणं व्यवस्थित गायलं तर सचिन त्याला वाट्टेल ते द्यायला तयार आहे. कांबळीनं हे चॅलेंज स्विकारलं असून त्याच्याकडे आता 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. क्रिकेटवाली बीट पे असं या गाण्याचं नाव आहे. सचिन आणि सोनूच्या या गाण्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता.

कशावर आधारीत आहे गाणं ?

काही वर्षांपूर्वी सचिन आणि सोनूनं गायलेलं हे गाणं सचिनच्या कारकीर्दीवर आधारीत होतं. सचिन कोणाकोणासोबत क्रिकेट खेळला, तसेच त्यानं कोणते फटके मारले आणि त्याला स्टेडियममध्ये कसा प्रतिसाद मिळायचा हे सगळं या गाण्यात दाखवण्यात आलं होतं. सोनूसोबतच सचिननंही हे गाणं गायलं होतं. सचिनचं कदाचित हे बॅकग्राऊंड सिंगिंगमध्ये पदार्पण असावं. कारण त्याआधी त्यानं कधी गाण गायलं आहे अशी कोणती माहिती नाही.

फेसबुक पेज लाईक करा –