‘मास्टर ब्लास्टर’ सचिनची ‘वर्ल्डकप’ टीम ‘माही’ महेंद्रसिंग धोनी ‘विना’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडूलकरने वर्ल्डकप समाप्त झाल्यानंतर २०१९ मधील सर्वोत्तम ११ क्रिकेटरची निवड केली आहे. यात महेंद्र सिंह धोनीचे नाव मात्र नाही. सचिनने आपल्या टीमचा कॅप्टन न्युझीलंडच्या केन विलियमसन असल्याचे सांगितले.

सचिन तेंडूलकरच्या टीममध्ये भारतातील ५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतू त्यात भारताचा विकेट किपर महेंद्र सिंह धोनीचा समावेश करण्यात आला नाही.

कोहली ४ थ्या स्थानी

रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो हे दोन सलामवीर आणि तिसऱ्या नंबरवर विलियमसन फलंदाजीसाठी येईल. भारतीय कॅप्टन कोहली ४ थ्या नंबरवर आहे तर त्यानंतर शाकिब – अल – हसन, बेन स्टोक्स, पंड्या आणि जडेजा यांचा नंबर लागतो.

तेंडूलकरने मिशेल स्टार्क, जोफरा आर्चर आणि बुमराह यांना आपले तीन गोलंदाज म्हणून निवडले आहे.
आयसीसीने देखील वर्ल्ड कप मध्ये आपल्या ११ खेळाडूंना निवडले आहे. यात फक्त रोहित आणि बुमराहला जागा देण्यात आली आहे.

सचिन तेंडूलकरची टीम

रोहित शर्मा, जॉनी बेयरस्टो, केन विलियमसन (कॅप्टन), विराट कोहली, शाकिब अल हसन, हार्दिक पंड्या, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’