सचिन तेंडुलकरने डॉक्टरेट पदवी नाकारली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पश्चिम बंगालमधील जाधवपूर युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी स्विकारण्यास नकार दिला आहे. यासाठी पदवी स्विकारणं नैतिकतेला धरुन नसल्याचं कारण दिल आहे . जाधवपूर युनिव्हर्सिटीकडून क्रीडा क्षेत्रात सर्वोकृष्ट कामगिरी करणाऱ्या आजी-माजी खेळाडूंचा डॉक्टरेट पदवी देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व ऑलिम्पियन बॉक्सर मेरी कोम यांना डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती.

सचिनने नकार कळवल्यानंतर जाधवपूर युनिव्हर्सिटीने मेरी कोमचा डॉक्टरेट पदवी देऊन सत्कार करण्याचं ठरवलं आहे. बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने पाचवेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. मेरी कोम व्यतिरीक्त टाटा मेडिकलचे डॉक्टर मामेन चंडी, अर्थतज्ञ कौशिक बसू, बँकर चंद्रशेखर घोष यांचाही डॉक्टरेट पदवी देऊन गौरव करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0582c927-bd84-11e8-964d-ef7d0a840699′]

जाधवपूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरु सुरंजन दास यांनी यासंदर्भातली माहिती दिली की , “आम्ही यासंदर्भात युनिव्हर्सिटीने इ-मेल करुन वेळ मागितली होती. मात्र आम्हाला आलेल्या उत्तरामध्ये सचिनने ही पदवी स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण कोणत्याही युनिव्हर्सिटीकडून पदवी स्विकारत नसल्याचं सचिनने स्पष्ट केलं”

[amazon_link asins=’B0778JFC13,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c75cf11-bd86-11e8-8eb6-e923204b1318′]

याआधी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून देण्यात आलेल्या पदवीचा स्विकार करण्यास सचिनने नकार दर्शवला होता. अशाप्रकारे डॉक्टरेट पदवी स्विकारणं नैतिकतेला धरुन नसल्याचं सचिनने आपल्या उत्तरात म्हटलं आहे.”

जेट एअरवेजच्या प्रवाशांकडून ३० लाखांच्या भरपाईची मागणी