…म्हणून वाहतूक पोलिसाला भेटला मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar, मुंबई पोलिसांनी केले ‘हे’ विशेष ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sachin Tendulkar | दोन दिवसांपूर्वी भारताचा लाडका क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या मित्राचा अपघात झाला होता. एका वाहतूक पोलिसाच्या (Mumbai Traffic Police) सतर्कतेमुळे या मित्राचा जीव बचावल्याने सचिनने प्रत्यक्ष भेट देऊन या पोलिसाचे आभार मानले. शिवाय ट्विटरवर कौतूक करणारी एक पोस्ट सुद्धा लिहिली. यानंतर सचिनला प्रतिसाद देत मुंबई पोलिसांनी देखील एक ट्विट केले आहे, जे सध्या खुप व्हायरल होत आहे.

 

दोन दिवसांपूर्वी सचिनच्या जवळच्या मित्राचा अपघात झाला. यावेळी सांताक्रुझ येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शिपाई सुरेश ढुमसे यांनी तातडीने त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यामुळे सचिनच्या (Sachin Tendulkar) मित्राचा जीव वाचला. आपल्या मित्राचे प्राण वाचवणारे वाहतूक पोलीस सुरेश ढुमसे यांची सचिनने प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले, आणि याबाबतची पोस्ट देखील लिहिली.

 

 

आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले होते सचिनने…
सचिनने लिहिलेल्या पोस्टला ’अशा व्यक्तींमुळेच हे जग सुंदर आहे…’ असे शिर्षक दिले होते. यात पुढे म्हटले होते, काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या व्यक्तीचा गंभीर अपघात झाला. देवाच्या कृपेने आता तो बरा आहे. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले.

 

ट्रॅफिक पोलिसाने समयसूचकता दाखवली. त्याने तातडीने जखमी व्यक्तीला ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये नेले.
तसेच गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला आणखी त्रास होणार नाही, याची काळजी घेतली.
मी त्या ट्रॅफिक पोलिसाला भेटलो. या सर्व मदतीबद्दल त्याचे आभार मानले.

 

 

Web Title :- Sachin Tendulkar | sachin tendulkar meets mumbai Police traffic cop suresh dhumse after he helped former cricketers close friend following a road accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Bison Pune | भरकटून पुण्याच्या कोथरूड परिसरात आलेल्या रानगव्याच्या मृत्यूची मुंबई हाय कोर्टाने घेतली दखल

Jaya Bachchan | सून ऐश्वर्या रायची ED ने केली चौकशी ! जया बच्चन यांनी भाजपला दिला शाप; म्हणाल्या – ‘वाईट दिवस लवकरच येतील’

 

Nashik Crime | संतापजनक ! लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून महिलेवर बलात्कार; महाराष्ट्रातील खळबळजनक घटना