Sachin Tendulkar | वनडे क्रिकेट टी-20 पेक्षा थरारक आणि रंजक होण्यासाठी सचिनने दिला ‘हा’ सल्ला

पोलीसनामा ऑनलाईन : Sachin Tendulkar | गेल्या काही वर्षात क्रिकेटच्या वनडे फॉर्मेटमध्ये खूप बदल झाला आहे. भारतात या वर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप होणार आहे. सध्या सुरु असलेल्या फॉरमॅटमधील हा शेवटचा वनडे वर्ल्डकप असेल असे मत क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी व्यक्त केले आहे. यावरून आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी सचिन तेंडुलकर यांनी आपले मत व्यक्त करताना वनडे क्रिकेटला वाचवण्यासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे.

काय म्हणाले सचिन तेंडुलकर?

एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे होत आहे यात काही शंका नाही असे सचिन तेंडुलकर म्हणाले आहेत. एकदिवसीय क्रिकेटला कसोटीप्रमाणेच 4 सत्रात विभागलं पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये तुमच्याकडे 20 विकेट असतात, इथे फक्त दहा. तुम्ही 25 षटकात बाद झालात तर उरलेल्या 25 षटकांसाठी पुन्हा तुम्ही फलंदाजी करू शकत नाही असे सचिन तेंडुलकर म्हणाले आहेत. म्हणजेच सचिन तेंडुलकर यांनी वनडे क्रिकेटला 25-25 अशा दोन खेळवण्याचा सल्ला दिला आहे.

सध्याच्या फॉरमॅटमध्ये वनडेत दोन डाव असतात आणि 50 ओव्हरचे दोन डावात दोन्ही संघाकडे प्रत्येकी 10 विकेट असतात. हा फॉर्मेट दिर्घ काळापासून सुरू आहे. पण काही वर्षांपूर्वी टी-20 क्रिकेट आले आणि ते सगळ्या देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले. यानंतर लोकांना वनडे क्रिकेट हे कंटाळवाणे वाटू लागले. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी सांगितलेल्या फॉर्मेटनुसार जर एखाद्या संघाने पहिल्या डावात 5 विकेट गमावल्या तर ते दुसऱ्या डावात म्हणजे 26 व्या षटकात त्याच्या पुढे खेळतील.मात्र जर एखादा संघ 25 षटकात ऑल आऊट झाला तर त्याला पुन्हा फलंदाजी मिळणार नाही. त्यामुळे दुसऱ्या संघाला संपूर्ण 50 ओव्हर खेळण्याची संधी मिळेल.

अनेक वेळा बदलला आहे वनडेचा फॉर्मेट

वनडे क्रिकेट फॉर्मेटची पहिली मॅच 1971 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झाली होती.
हा सामना कसोटीच्या जागी खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 5 विकेटनी
विजय मिळवला होता. यानंतर 1975 पासून वनडेचा अधिकृत फॉर्मेट आला आणि वनडे वर्ल्डकपची सुरुवात झाली.
सुरुवातीच्या काळात वनडे क्रिकेटमध्ये 60 षटके होती आणि खेळाडू पांढरा शर्ट, पँट घालत होते.
यात काळानुसार बदल होत गेले आणि हा फॉरमॅट 50 ओव्हरचा करण्यात आला.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका, द.आफ्रिका, झिम्बाब्वे, बांगलादेश,
अफगाणिस्तान आणि आयर्लंड, स्कॉटलंड, युएई, नेपाळ, नेदरलँड्स, नामिबिया, ओमान, पापूआ न्यू गेनुआ,
अमेरिका, केनिया, कॅनडा, बरमुडा या देशांना वनडे क्रिकेटचा दर्जा देण्यात आला आहे. यामधील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,
भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका, द.आफ्रिका, झिम्बाब्वे, बांगलादेश, अफगाणिस्तान
आणि आयर्लंड या संघाना कसोटीचा दर्जा देण्यात आला आहे. बाकी संघ फक्त वनडे क्रिकेट खेळतात.

Web Title :- Sachin Tendulkar | sachin tendulkar talk about new format of odi cricket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde – Gopinath Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’