सचिनचा ‘मास्टरस्ट्रोक’नंतर युवराज म्हणाला – ’मर गए’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे सर्व स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण घरात बसून सोशल मीडियावर एकमेकांना आव्हान देत आहेत. युवराज सिंगने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात चेंडू बॅटने हवेत उडवताना दिसतो. त्याने सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांना हे आव्हान दिले होते. युवराजने दिलेले आव्हान पूर्ण केल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याला पुन्हा चॅलेंज दिले आहे.

सचिनने ट्विट करीत, युवराज तु मला सोपा पर्याय दिला होता. म्हणून मी तुला कठीण पर्याय देत आहे. तुला नॉमिनेट करतोय. ये आणि आता हे पूर्ण कर, असे आव्हान दिले आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सचिनने डोळ्यावर पट्टी बांधून बॅट हातात घेतली असून चेंडू बॅटवर उडवत आहे.

सचिनने 32 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात चेंडू सतत बॅटच्या एजवर उडवल्यानंतर सचिन म्हणतो की, युवी तुझं चॅलेंज स्वीकारले होते. आता तुला पुन्हा चॅलेंज हे पट्टी बांधून कर. युवराजने दिलेल्या चॅलेंजनंतर सचिनने ते पूर्ण करत व्हिडिओ शेअर केला. पण त्यासोबत युवराजला पुन्हा चॅलेंज केले आहे. सचिनचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सचिनच्या या चॅलेंजवर युवराजने मात्र चक्क मर गए असे उत्तर दिले आहे.