ICC च्या ट्विटवर सचिन-गांगुलीचा गमतीशीर रिप्लाय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची जोडगोळी खूपच मोठी आहे. दोघांनी 1999 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर नव्या भारतीय संघाला दिशा देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. तसेच मॅच फिक्सिंग सारख्या संकटातून भारताला वर आणले. भारतीय फलंदाजीची धुरा या दोघांनी समर्थपणे पेलली असून सलामीवीर जोडी म्हणून या दोघांनी दमदार कामगिरी केली आहे. जोडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका ट्विटच्या माध्यमातून सलाम केला आहे. आयसीसीने सचिन आणि गांगुली यांचा एक एकत्रित फोटो ट्विट केला.

फोटोवर लिहिले की वन डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर + सौरव गांगुली म्हणजे 176 वेळा दमदार भागीदारी, 8 हजार 227 धावा आणि सरासरी 47.55 इतर कोणत्याही फलंदाजांच्या जोडीने अद्याप 6 हजार धावांचा पल्लाही गाठलेला नाही. असे ट्वीट केले होते. या ट्विटवर सचिनने धमाल रिप्लाय दिला. ही आठवण खूपच मस्त आहे, दादी (गांगुली). पण तुला काय वाटते 30 यार्डच्या वर्तुळाबाहेर 4 खेळाडू आणि 2 नवे चेंडू असते तर आपण अजून किती धावा काढू शकलो असतो?, असे लिहिल त्याने मस्करी करण्याचा ईमोजी वापरला. सौरव गांगुलीदेखील रिप्लायसाठी तयारच होता.

गांगुलीच्या सचिनच्या ट्विट वर लगेच उत्तर दिले आहे. मला वाटते अजून 4 हजार धावा आपण सहज केल्या असत्या. आणि सामन्यात दोन नवे चेंडू ऐकला खूप मस्त वाटते आहे. कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू संपूर्ण सामनाभर सीमारेषेपार जाताना दिसतोय. असा रिप्लाय गांगुलीच्या दिला आहे. त्यामुळे नेटकर्‍यांनी याला पसंती दिली आहे.