सचिनचं पहिलं ‘प्रेम’ अंजली नव्हे तर दुसरंच कुणीतरी, ‘मास्टर ब्लास्टर’नं शेअर केला VIDEO

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज व्हॅलेंटाइन डे असून हा प्रेमाचा दिवस असल्याने प्रत्येकजण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत हा दिवस साजरा करतात. कुणी सोशल मीडीयाच्या माध्यमातून आपल्या पहिल्या प्रेमाविषयी सांगतात आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात. पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या लक्षात रहातच असते. आजच्या दिवशी तिचा विचार मनात आला की आपसूकच मनात विचार येतो सध्या ती काय करते ? या विचारातून कोणीही सुटत नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील या प्रश्नातून सुटला नाही.

मास्टर ब्लास्टर सचिन आणि त्याची पत्नी अंजली ही जोडी अनेकांची आवडती जोडी आहे. या जोडीबद्दल ऐकायला प्रत्येकालाच आवडते. आजच्या व्हॅलेंटाईन दिवशी सचिन तेंडूलकरने आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना धक्का दिला आहे. सचिन तेंडूलकरचे पहिले प्रेम अंजील नसून दुसरेच कुणीतरी आहे. त्याने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या पहिल्या प्रेमाची कबूली दिली आहे. My First Love ! असे कॅप्शन देऊन सचिने व्हिडीओ शेअर केला असून काही तासातच त्याच्या व्हिडीओला लाखोंच्या लाइक्स मिळाल्या आहेत.

भारतात आणि जगभरात सचिनचे अनेक चाहते आहेत. भारतामध्ये क्रिकेट म्हणजे सचिन असे समिकरणच बनले आहे. सचिनला खेळताना पाहणं म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. त्यामुळे सचिनने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सचिनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनके चाहत्यांना धक्का बसला तर काहिंचा हिरमोड झाला. पण हा महिना सचिनसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास आहे.

फेब्रुवारी महिन्यातच सचिन तेंडूलकर हातामध्ये बॅट घेऊन मैदानात उतरला होता. 9 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज एलिस पॅरीने सचिन तेंडुलकरला आव्हान दिले होते. सचिने देखील ते आव्हान स्विकारले. दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 चा सामना सुरु असताना सचिनने फलंदाजी केली. सचिन मेलबर्नच्या मैदानावर आपल्या नेहमीच्या अंदाजात उतरला. याआधी सचिन क्रिकेटच्या मैदानावर ज्या शैलीत खेळायचा त्याच शैलीत यावेळीही खेळताना दिसला होता.

You might also like