Video : गुरू पोर्णिमा ! सचिन तेंडुलकरनं शेअर केला व्हिडीओ, ‘या’ तिघांना केलं वंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील आणि गुरु ही दैवते सांगण्यात आली आहेत. गुरु आपणास ज्ञान देतो. जो व्यक्ती आपणास ज्ञाने देतो, तो आपला गुरुच असते. गुरुचे आपल्यावर अनंत उपकार असतात. या उपकाराची फेड उभ्या आयुष्यात करता येत नाही. संपूर्ण देशभरात आजच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या गुरुला वंदन करून त्याच्याविषयी आदराची भावना व्यक्त करत असतो.

 

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही आजच्या दिवशी आपल्या आयुष्यातील तीन गुरुंचे आभार मानले आहेत. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत, क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारा आपला भाऊ, आचरेकर सर आणि आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. सचिन सांगतो की, जेव्हा मी बॅट उचलतो तेव्हा माझ्या मनात तीन लोकांची नावे येतात, जी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेत. आज मी जो काही आहे ते फक्त या तीन लोकांमुळे आहे.

माझ्या भावामुळे मी क्रिकेट खेळायला लागलो, प्रत्येकवेळी मी खेळण्यासाठी मैदानात उतरायचो त्यावेळी माझा भाऊही माझ्यासोबत असायचा असं मला वाटायचं. माझ्या आधी माझ्या भावाने मला आचरेकर सरांकडे नेण्याचा निर्णय घेतला. आचरेकर सरांनी लहानपणी माझी फलंदाजी सुधारावी यासाठी अनेक तास खर्च केले आहेत. वडिलांनी आयुष्यात मला नेहमी कधीही शॉर्टकटचा वापर करू नकोस असा सल्ला दिला. या तिघांमुळे आज मी यशस्वी झाल्याचे सचिनने सांगितले.