‘बापाचा पैसा वाया घालवतेस’?; भडकली सारा तेंडुलकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट टीम मधील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा ही सोशल मीडियावर फेमस आहे. २३ वर्षीय साराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. १२ ऑक्टोबर १९९७ साली सचिन व अंजलीच्या घरी सारा जन्माला आली. सारा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यासोबतच्या तिच्या प्रेमाच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. तसेच भाऊ अर्जुन तेंडुलकरवरून तिला अनेकदा ट्रोलही केलं गेलं आहे.

अशात सारानं कधीच कोणत्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु शुक्रवारी तिनं ट्रोलरला सहज-सोप्या भाषेत सुनावले. सारानं शुक्रवारी तिच्या इस्टा स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात ती गाडीत प्रवास करताना हातात कॉफीचा कप पकडलेली दिसत आहे. यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. ‘बापाचा पैसा वाया घालवतेस’, अशी टीका केली. सारानं ट्रोलर्सचा स्क्रीनशॉट शेअर करून सडेतोड उत्तर दिले. ‘कॉफी खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करणे, यात चुकीचे काय आहे. याला तुम्ही पैसा वाया घालवणे म्हणूच शकत नाही. ‘

सारानं लिहिली पोस्ट…
आयपीएल २०२१साठी अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होताच बहीण सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar) हीनं सोशल मीडियावरून त्याचे अभिनंदन केलं. सारानं इंस्टा अकाऊंटवरील स्टोरीत अर्जुनसोबतचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं की,”हे यश तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हे तुझंच आहे. तुझा अभिमान वाटतो भावा; अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात,”