Sachin Vaze : सचिन वाझेचं आणखी एक कृत्य आलं समोर, ‘या’ खास अधिकार्‍यानेच नष्ट केले पुरावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सचिन वाझे (Sachin Vaze) यांचे खास क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काझी यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईतील कारमायकल रोड (Carmichael Road) वर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीसंदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचं काम सचिन वाझे आणि टीमनं केलं होतं. याच संदर्भात आता काझींचा व्हिडीओ समोर आला आहे.

कोणतीही माहिती काझींनी मुंबई क्राईम ब्रांचच्या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत नमूद केली नव्हती

दक्षिण मुंबईतील कारमायकल रोडवर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. यासंदर्भातील पुरावे नष्ट करण्यासाठी रियाजुद्दीन काझी मुंबईतील कन्नमवार नगर येथे असलेल्या बंटी नावाच्या एका गॅरेजमध्ये गेले होते. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर रियाजु्द्दीन काझी यांनी ताब्यात घेतला. तसंच गॅरेज चालक सावंत नावाच्या व्यक्तीलाही चौकशीसाठी घेऊन गेले होते. मात्र या संदर्भातील कोणतीही माहिती त्यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत नमूद केली नव्हती.

तपास यंत्रणांच्या हाती लागला रियाजुद्दीन काझी यांचा व्हिडीओ, नंतर झाली कसून चौकशी

तपास जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, सचिन वाझे टीमनं याच बंटी गॅरेजमध्ये विविध प्रकारच्या नंबर प्लेट बनवल्या होत्या. या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये यासाठी पुरावे नष्ट केले जात होते. या दरम्यान रियाजुद्दीन काझी हे विक्रोळी कन्नमवार नगर येथील बंटी नावाच्या गॅरेजमध्ये गेले होते आणि हा प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तो आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यावरूनच रियाजुद्दीन काझी यांची चौकशीसुद्धा करण्यात आली आहे.

विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं ताब्यात घेतले होते आणि सर्व पुरावे त्यांनी नष्ट देखील केले

एनआयएच्या तपासात असं समोर आलं आहे की, 25 फेब्रुवारी रोजी कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्यानंतर एकेक करून 26 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान ठाण्यातील वाझे रहात असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फूटेज, ठाण्यातील सद्गुरू कार डेकोर या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज, सोबतच दुकानातील सर्व रेकॉर्ड आणि विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं ताब्यात घेतले होते आणि सर्व पुरावे त्यांनी नष्ट देखील केले असंही तपासात उघड झालं आहे.

तपास तपास यंत्रणांच्या हाती जे पुरावे लागले त्या संदर्भातील माहिती काझींच्या चौकशीतही समोर आली

एनआयए च्या टीमनं रियाजुद्दीन काझी यांची तब्बल 5 दिवस रोज सलग 10 तास चौकशी केली. याचदरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या. दरम्यान रियाजु्द्दीन काझी माफीचे साक्षीदार बनणार असल्याची चर्चा समोर आली. एकेक करून या तपास तपास यंत्रणांच्या हाती जे काही पुरावे लागले त्या संदर्भातील माहिती ही रियाजुद्दीन काझी यांच्या चौकशीत सुद्धा समोर आली असल्याचं समजत आहे.