Param Bir Singh | हायकोर्टाच्या सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, CBI चौकशीची टांगती तलवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या तक्रारीमुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. मागील तीन महिन्यापासून सीबीआय अनिल देशमुखांची (Anil Deshmukh) चौकशी करत आहे. आता सीबीआयच्या रडारवर परमबीर सिंग (Param Bir Singh) येण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) झालेल्या सुनावणीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर CBI चौकशीची टांगती तलवार असणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वाची टीप्पणी केली आहे. हायकोर्टाच्या टीप्पणीमुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन प्रमुख असलेले ते निर्दोष आहेत असा दावा करु शकत नाहीत. कारण ते देखील यात समान जबाबदार आहेत. सचिन वाझेला 16 वर्षाच्या निलंबन कालावधीनंतर पुन्हा पोलीस सेवेत घेण्यावरुन हायकोर्टाने हे विधान केले आहे. कोणाताही प्रशासन प्रमुख हा सत्ताधाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत होतो हे सांगून स्वत: निर्दोष असल्याचा दावा करु शकत नसल्याचे हायकोर्टाने म्हटलं आहे.

प्रशासनाचा प्रमुखही तितकाच जबाबदार

प्रशासनाचा प्रमुखही तितकाच जबाबदार आहे. असंही असू शकतं की, मंत्र्याने सचिन वाझेला पुन्हा घेण्याचे आदेश दिले आसावेत. मात्र, उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने त्याच्या कर्तव्याचे पालन न करता फक्त आदेशाचं पालन करु शकतो का ? आम्हाला अपेक्षा आहे की, सीबीआय त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवेल. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून यातील मुख्य दोषी कोण आहेत. याचा शोध घेतील अशी आमची अपेक्षा आहे, असंही उच्च न्यायालयाचे न्यायधीश शिंदे यांनी म्हटले आहे.

CBI ने घेतले सचिन वाझेचे स्टेटमेंट

परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहलं होतं. यामध्ये अनिल देशमुख यांनी सचिन वाझेवर 100 कोटी वसुलीसाठी दबाव टाकला होता, असा आरोप केला होता. यानंतर मुंबई हायकोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर सीबीआय चौकशी सुरु झाली. त्यानंतर ईडीने देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु केली. ज्यामध्ये सचिन वाझेचं जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवण्यात आला. सीबीआयनेही सचिन वाझेचे स्टेटमेंट घेतले आहे.

NIA ने परमबीर सिंग यांचा नोंदवला जबाब

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी NIA ने चौकशी सुरु केली. NIA नं परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवला आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात त्यांनी आरोपी बनवण्यात आलं नाही. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानुसार, जेव्हा परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला तोपर्यंत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुनील माने आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाली नव्हती. सुनील माने आणि प्रदीप शर्मा यांनी परमबीर सिंग यांचे नाव घेतले का ? यासंदर्भात अधिकृत माहिती समजू शकली नाही.
परंतु जोपर्यंत यात आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत परमबीर सिंग यांच्या मनात धाकधुक कायम आहे.
Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : sachin vaze cbi nia might take action against former police commissioner param bir singh

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान

Kappa variant | डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवीन कप्पा व्हेरिएंट, जाणून घ्या याची लक्षणे आणि कसे पडले याचे नाव