Sachin Vaze : NIA च्या हाती लागली वाझेच्या वसुलीची कागदपत्रे, अधिकार्‍यांची नावे उघड होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या यांचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करत आहे. तर एनआयएच्या तपासात आता महत्वपूर्ण कागदपत्रे हाती लागले आहेत. यामध्ये संशयित मुंबई पोलीस दल आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे नावे आहेत. या लोकाना लाच म्हणून प्रति महिना पैसे दिले जात असत असे समोर आले आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे या क्लबमध्ये कायम येत जात होते, येथे त्यांनी वाझेंनी क्रिकेट बुकी नरेश गौर आणि सहआरोपी विनायक शिंदेला नोकरीही लावली होती. तर हे दोघंही एनआयएच्या ताब्यात आहेत. तर यामध्ये सापडलेल्या एका कागदपत्रात कार्यालय, अधिकाऱ्यांच्या नावासह त्यांच्या पदाचा उल्लेख देखील आहे, तसेच प्रत्येक अधिकाऱ्यांच्या नावापुढे किती रक्कम आहे हे नमूद केले आहे. यामध्ये महिन्यातील तारखा आहे. येथे नमूद केलेली रक्कम संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून प्रति महिन्याला दिली जात होती. असा अधिकाऱ्यांना संशय आहे. अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून दिली गेली आहे.

यादरम्यान, तपासामध्ये वाझे चौकशीदरम्यान काही वेगळी धक्कादायक माहिती देत आहे, तर NIA मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ही बाब त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार न्यायालयाने NIA ला पडताळणी करण्यास सांगितल्यास तर यामध्ये वरिष्ठ अधिकारी व इतर व्यक्तींना चौकशीला पाचारण करावे लागणार आहे. तसेच यामधून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित API सचिन वाझे यांच्या एनआयएने केलेल्या तपासात दक्षिण मुंबईमधील गिरगाव येथील एका क्लबवर छापा टाकला गेला. तर क्लबमध्ये अनेक कागदपत्रे हाती लागले आहेत. तर या कागदपत्रावरून एनआयए आता झडती घेणार आहे. वाझे हे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहेत. यावरून एनआयए पथकाने क्लबचे मालक आणि इतर व्यक्तीची चौकशी करणार आहे. तसेच तपासादरम्यान आवश्यकता असल्यास सर्व कागदपत्रे एनआयए हे आयकर विभाग आणि CBI कडे सुपूर्द करणार आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीतनुसार, एका पोलीस उपायुक्तासह २ निरीक्षक व १ माजी अधिकारी NIA च्या रडारवर आहेत. तर या चौघांचे त्याच्या वसुलीच्या आर्थिक व्यवहारात संबंध असल्याचे माहिती मिळते असे पुढं आले आहे. परंतु स्कॉर्पिओ कार आणि हिरेन हत्येत त्यांच्या सहभागाबद्दल अजून पुरावे मिळालेले नाहीत. त्यातील त्यांची भूमिका काय आहे हे तपासण्यात येत असून, आवश्यकता भासल्यास लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. चारहीजण आणि सचिन वाझेमध्ये ठाणे कनेक्शनही ही एक बाब समानता आहे. तसेच चौघांपैकी पोलीस उपायुक्त आणि मुंबई मधील १ निरीक्षक, तर बाकी ठाणे येथील आहेत. तिघांकडे प्राथमिक टप्प्यात चौकशी करण्यात आली आहे. असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे