Sachin Vaze । CBI नंतर आता ED करणार सचिन वाझेची चौकशी, तळोजा तुरुंगात चौकशी करण्यास कोर्टाची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या या प्रकरणामध्ये सध्या पोलीस दलातून बरखास्त केलेले सचिन वाझे (Sachin Vaze)हे मुंबईच्या तळोजा जेलमध्ये आहेत. मागील काही दिवसापासून ते सीबीआय चौकशीत होते. आता मात्र सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चौकशी सक्तवसुली संचालनालय (ईडी) करणार आहे. (गुरुवारी) 8 जून रोजी तळोजा तुरुंगात चौकशी करण्याची परवानगी विशेष पीएमएलए (PMLA Court) कोर्टाने ED ला दिली आहे. यानुसार ED आता वाझेची चौकशी तळोजा तुरुंगात जाऊन करणार आहे. Sachin Vaze | money laundering case ed record sachin waze statement permission granted by court

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

काही दिवसापूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ED) राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर तपासणीनंतर दोन्ही सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना त्यावेळी अटक करण्यात आले. अटकेनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझेनी मुंबईतील हॉटेल बार मालकांकडून तब्बल 4 कोटी 70 लाख रुपये वसूल करून 2 हप्त्यांमध्ये शिंदे यांच्याकडे दिले होते, याबाबत कबुली देशमुख यांचे सचिव कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांनी दिल्याचा दावा ED कडून करण्यात आला आहे.

या दरम्यान, अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सचिवांना 70 लाख रुपये दिले होते, असा धक्कादायक खुलासा सचिन वाझेने जबाबात नोंदवला आहे. अनिल देशमुख थेट आदेश द्यायचे असे देखील सचिन वाझेनं आपल्या जबाबात म्हटलं होतं. तर याच जबाबानुसार सचिन वाझेची चौकशी करायची असल्याने वाझे तळोजा तुरुंगात आहेत. आणि तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ED ला मिळावी आहे. याबाबत विनंती अर्ज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला होता. ED चा अर्ज कोर्टानं (PMLA Court) ग्राह्य धरला आहे.
Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Sachin Vaze | money laundering case ed record sachin waze statement permission granted by court

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा